नको रे बोलूस माझ्याशी
नको रे बोलूस माझ्याशी
प्रीत दाविशी एकीसंगे संगत दुसरीशी
शीळ घालिशी चंद्रावळीशी
गुज बोलिशी राधेपाशी
नट मुलखाचा तू हृषिकेशी
गोकुळवासी मुली भुलविसी
खेळशी दिवस-निशी
गोकुळातील द्वाड पोरटी
दहीदुध चोरीती तुझ्याचसाठी
गोपी फिरती तुझ्याच पाठी
अप्पलपोट्या तू मुलखाचा
कळे न कोणाशी
प्रीत दाविशी एकीसंगे संगत दुसरीशी
शीळ घालिशी चंद्रावळीशी
गुज बोलिशी राधेपाशी
नट मुलखाचा तू हृषिकेशी
गोकुळवासी मुली भुलविसी
खेळशी दिवस-निशी
गोकुळातील द्वाड पोरटी
दहीदुध चोरीती तुझ्याचसाठी
गोपी फिरती तुझ्याच पाठी
अप्पलपोट्या तू मुलखाचा
कळे न कोणाशी
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | संथ वाहते कृष्णामाई |
गीत प्रकार | - | चित्रगीत, हे श्यामसुंदर |
गुज | - | गुप्त गोष्ट, कानगोष्ट. |
चंद्रावळी | - | चंद्राच्या अष्टनायिकांपैकी एक. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.