नका गडे माझ्याकडे
नका गडे माझ्याकडे पुन्हा पुन्हा पाहू
लाजरीच्या रोपटीला दृष्ट नका लावू
घोटाळते पायामाजी तुरुतुर चाल
आडतात ओठावरी मनांतले बोल
नका बाई माझ्यामागे नदीवरी येऊ
पाहिल ना कुणीतरी सोडा माझी वाट
मुलुखाचे द्वाड तुम्हीं निलाजरें धीट
इतुक्यावरी हासूनिया वेड नका लावू
माथ्यावरी वैशाखाचे रणरणे ऊन
छंदीफंदी डोळियांचे त्यात आगबाण
बावरल्या हरिणीची नका पाठ घेऊ
लाजरीच्या रोपटीला दृष्ट नका लावू
घोटाळते पायामाजी तुरुतुर चाल
आडतात ओठावरी मनांतले बोल
नका बाई माझ्यामागे नदीवरी येऊ
पाहिल ना कुणीतरी सोडा माझी वाट
मुलुखाचे द्वाड तुम्हीं निलाजरें धीट
इतुक्यावरी हासूनिया वेड नका लावू
माथ्यावरी वैशाखाचे रणरणे ऊन
छंदीफंदी डोळियांचे त्यात आगबाण
बावरल्या हरिणीची नका पाठ घेऊ
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | गोविंद कुरवाळीकर |
गीत प्रकार | - | भावगीत |
पाठ घेणे | - | पाठलाग करणे / गळ घालणे. |
फंदी | - | नादी, छांदिष्ट. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.