नदीच्या पल्याड बाई
नदीच्या पल्याड बाई झाडी लई दाट
तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट
ओलांडता झाडी लागे रामाची टेकडी
दिसते तिथून माझ्या मामाची झोपडी
झोपडीपासून वाहे झुळुझुळु पाट
मुलं मामाची पाहून उतरतो शीण
मामीच्या मायेत रात्र एखादी राहून
माहेराची ओढ लागे होताच पहाट
जाता जरा पुढे लागे शिवाचा शिवार
कसलेली शेती पीक देई दाणेदार
धन्यापरी ताठ उभी जोंधळ्याची ताट
तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट
ओलांडता झाडी लागे रामाची टेकडी
दिसते तिथून माझ्या मामाची झोपडी
झोपडीपासून वाहे झुळुझुळु पाट
मुलं मामाची पाहून उतरतो शीण
मामीच्या मायेत रात्र एखादी राहून
माहेराची ओढ लागे होताच पहाट
जाता जरा पुढे लागे शिवाचा शिवार
कसलेली शेती पीक देई दाणेदार
धन्यापरी ताठ उभी जोंधळ्याची ताट
गीत | - | वामन कर्डक |
संगीत | - | मधुकर पाठक |
स्वर | - | सुप्रभात काळे |
राग | - | जयजयवंती |
गीत प्रकार | - | भावगीत |
शिवार | - | शेत. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.