शुभसमयाला । गोड गोड गोड ॥
दिपले पाहुनिया । देवही हर्षभरे ।
ढाळुनीया सुमने वदती । धन्य धन्य धन्य ॥
गीत | - | मो. ग. रांगणेकर |
संगीत | - | मास्टर कृष्णराव |
स्वर | - | ज्योत्स्ना भोळे |
नाटक | - | कुलवधू |
राग | - | भैरवी |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
सुमन | - | फूल. |
एक यशस्वी पत्रकार म्हणून मो. ग. रांगणेकर यांना वाचक ओळखत होते. 'आशीर्वाद', 'नंदनवन', 'कन्यादान' ह्या आपल्या सुरवातीच्या नाटकांनी रांगणेकर नाटककार म्हणून ओळखले जाऊ लागले. परंतु 'कुलवधू'त त्यांनी मांडलेल्या स्त्रियांच्या प्रश्नांना प्रातिनिधिक स्वरूप मिळाले आणि सामाजिक नाटकांना एक नवीन परिमाण लाभले. शिवाय नवीन प्रकारच्या आटोपशीर संगीत नाटकांना मानाचे स्थान मिळवून देण्यात रांगणेकरांचे 'कुलवधू', त्यातील नायिका ज्योत्स्ना भोळे आणि संगीतकार मास्तर कृष्णराव यांचा फार मोठा वाटा आहे.
आता १९८६-८७ साली नाटकाचे व्यावसायिक प्रयोग बंद होऊन पंधराएक वर्षे उलटल्यावर देखील 'कुलवधू'चा मराठी साहित्याचे लेणे म्हणून उल्लेख होतो आणि मो. ग. रांगणेकर यांना 'राम गणेश गडकरी' पारितोषिकाचा सन्मान दिला जातो ह्या गोष्टी 'कुलवधू'च्या गुणवत्तेच्या आणि अखंड लोकप्रियतेच्या साक्षी आहेत.
(संपादित)
'कुलवधू' या नाटकाच्या पुस्तकाच्या सातव्या आवृत्तीच्या मलपृष्ठावरून.
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.