ना खंत नाही खेद
ना खंत नाही खेद जे जाहले तयाचा
विजयी कुणी धनी हो कोणी पराजयाचा
मी मानिले मनांचा जो एक मेळ होता
तव धुंद पापणीचा तो एक खेळ होता
प्रीतीस शाप आहे नित् एकलेपणाचा
जितुकी घडे कहाणी, जितुकी उरे अधुरी
त्यांचा सदा ऋणी मी, मज ही पुरे शिदोरी
प्रीतीत रंगलो मी, आनंद एक याचा
जग वेगळे तुझे ते, तुज मी अता अनोखा
टाकील परी पुसोनी त्या कोण प्रीतीलेखा
हे गीत अंतरीचे नच आदि-अंत याचा
विजयी कुणी धनी हो कोणी पराजयाचा
मी मानिले मनांचा जो एक मेळ होता
तव धुंद पापणीचा तो एक खेळ होता
प्रीतीस शाप आहे नित् एकलेपणाचा
जितुकी घडे कहाणी, जितुकी उरे अधुरी
त्यांचा सदा ऋणी मी, मज ही पुरे शिदोरी
प्रीतीत रंगलो मी, आनंद एक याचा
जग वेगळे तुझे ते, तुज मी अता अनोखा
टाकील परी पुसोनी त्या कोण प्रीतीलेखा
हे गीत अंतरीचे नच आदि-अंत याचा
गीत | - | वसंत निनावे |
संगीत | - | बाळ बर्वे |
स्वर | - | तलत महमूद |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.