देवांचाही देव करतो
सेवाधर्मी पुण्य आहे सांगे सखा श्रीहरी
देवांचाही देव करितो भक्तांची चाकरी
भल्या पहाटे गाऊन ओवी, जनीचे जाते ओढी
सुखदु:खाचं जातं, परमार्थाचा त्यात, घास मी भरिला
जनी गाते ओव्या रे, तू ये रे बा विठ्ठला
संत सखूचा कैवारी हा रांधून उष्टे काढी
सावत्यासंगे भाजी खुडुनी मळा राखणी करी
नाथाघरी ही विठू माउली अखंड भरते पाणी
राम सावळा शेले विणतो, कबीर गातो गाणी
गोर्यासंगे चिखल तुडविता तल्लिन हो अंतरी
देवालाही चुकला नाही कर्मभोग हा असा
अजाणता हा परमात्म्याला आत्मा भेटे जसा
अगाध आहे नियतीची ही किमया परमेश्वरी
देवांचाही देव करितो भक्तांची चाकरी
भल्या पहाटे गाऊन ओवी, जनीचे जाते ओढी
सुखदु:खाचं जातं, परमार्थाचा त्यात, घास मी भरिला
जनी गाते ओव्या रे, तू ये रे बा विठ्ठला
संत सखूचा कैवारी हा रांधून उष्टे काढी
सावत्यासंगे भाजी खुडुनी मळा राखणी करी
नाथाघरी ही विठू माउली अखंड भरते पाणी
राम सावळा शेले विणतो, कबीर गातो गाणी
गोर्यासंगे चिखल तुडविता तल्लिन हो अंतरी
देवालाही चुकला नाही कर्मभोग हा असा
अजाणता हा परमात्म्याला आत्मा भेटे जसा
अगाध आहे नियतीची ही किमया परमेश्वरी
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | विश्वनाथ मोरे |
स्वर | - | उत्तरा केळकर |
चित्रपट | - | आई |
गीत प्रकार | - | चित्रगीत, भक्तीगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.