मुक्कामाला र्हावा पाव्हणं
माघ मास पडली थंडी, पती माझे गेले गावा
मुक्कामाला र्हावा, पावणं मुक्कामाला र्हावा
मजल फार पडली तुम्हा, जरा ओसरीला टेका
गरम तापविते हंडा, हातपाय थोडे शेका
लिंबोणीला बांधा घोडा, चारा-पाणी त्याला दावा
मुक्कामाला र्हावा, पाव्हणं मुक्कामाला र्हावा
दूर वावराची वस्ती, गाव लांब तिकडं राही
तिन्हीसांज टळुनी गेली, येत-जात कुणी नाही
चार घास माझ्या हातचे ऊन ऊन तुम्ही जेवा
मुक्कामाला र्हावा, पाव्हणं मुक्कामाला र्हावा
सकाळीच न्हाले होते अजून केस ओले ओले
आवतन्यावाचून तुमचे पाय कसे दारी आले
उरूस बघायासी गेल्या सासुबाई-नणंदा-जावा

गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | झाला महार पंढरीनाथ |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी |
आवतण | - | निमंत्रण, बोलावणे. |
उरूस | - | विवाहानिमित्तची जेवणावळ / मुसलमान सत्पुरुषाच्या पुण्यतिथीनिमित्त होणारा उत्सव. |
तिनिसांज | - | सांजवेळ, तिनिसांज, तिनिसांजा, तिनीसांज, तिनीसांजा, तिन्हिसांजा, कातरवेळ हे सर्व शब्द 'संध्याकाळ' या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. सांजवणे, सांजावणे, सांजळणे म्हणजे संध्याकाळ होणे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.