A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मुदित सवत नच

मुदित सवत नच या काला; हंसली गदा न;
कसली फुगली, बसली रुसली;
नाहीं निज रिपुपण तिज जलांत बुडतां दिसला ॥

समरीं बलधर वीरांचा कर हिज दावी अरिवरविनाश;
हा खरा उपचार, शोभवी फार अबला ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - भास्करबुवा बखले
स्वर- बालगंधर्व
नाटक - द्रौपदी
राग - बिहाग
ताल-त्रिवट
चाल-ना देरे तन तदेरे ना
गीत प्रकार - नाट्यसंगीत
अरि - शत्रु.
उपचार - रीत, शिष्टाचार.
मुदित - हर्षभरित, आनंदित.
रिपु - शत्रु.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.