सहज तुला गुपित एक
सहज तुला गुपित एक सांगते दुपारी
डोळियांत आली गडे प्रीत माझी लाजरी
बैसते ओटीवरी नजर वळे अंगणी
अंगणांत बहरते रानजाई देखणी
जाईखाली उभा असे हासरा शिकारी
सांजवेळी गोठ्यांतली गाय लागे हंबरू
सोडते ग धारेसाठी, ओढ घेई वासरू
गोठ्यामधे दिसे सखे सावळा मुरारी
पहाटेला ओठांवरी गीत एक जागले
अंतरांत कोणसे हळुच बाई बोलले
ओढाळले मन नेई माझिया सासरी
डोळियांत आली गडे प्रीत माझी लाजरी
बैसते ओटीवरी नजर वळे अंगणी
अंगणांत बहरते रानजाई देखणी
जाईखाली उभा असे हासरा शिकारी
सांजवेळी गोठ्यांतली गाय लागे हंबरू
सोडते ग धारेसाठी, ओढ घेई वासरू
गोठ्यामधे दिसे सखे सावळा मुरारी
पहाटेला ओठांवरी गीत एक जागले
अंतरांत कोणसे हळुच बाई बोलले
ओढाळले मन नेई माझिया सासरी
गीत | - | अशोक जी. परांजपे |
संगीत | - | अशोक पत्की |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
गीत प्रकार | - | भावगीत, नयनांच्या कोंदणी |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.