मोगरा फुलला (१)
मोगरा फुलला मोगरा फुलला ।
फुलें वेंचितां बहरू कळियांसी आला ॥१॥
इवलेंसे रोप लावियलें द्वारी ।
त्याचा वेलु गेला गगनावेरी ॥२॥
मनाचिये गुंती गुंफियेला शेला ।
बाप रखुमादेविवरी विठ्ठलें अर्पिला ॥३॥
फुलें वेंचितां बहरू कळियांसी आला ॥१॥
इवलेंसे रोप लावियलें द्वारी ।
त्याचा वेलु गेला गगनावेरी ॥२॥
मनाचिये गुंती गुंफियेला शेला ।
बाप रखुमादेविवरी विठ्ठलें अर्पिला ॥३॥
गीत | - | संत ज्ञानेश्वर |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | लता मंगेशकर |
राग | - | गोरख कल्याण |
गीत प्रकार | - | संतवाणी |
वेरी | - | पर्यंत. |
भावार्थ-
एखाद्या मोगर्याचा वेल पाहतापाहता मांडव व्यापून जावा.. त्याच्या फुलांनी, कळ्यांनी, सारे आसमंत गंधित होऊन जावे, तसे भक्ताच्या मनातले इवलेसे आत्मतत्व पाहतापाहता आकाशभर झाले आणि सर्व आसमंतच गंधित होऊन गेला. आत्मतत्त्वाच्या मनोवेलीला फुले आली ती परमेश्वरामुळेच. तेव्हा या सार्या फुलांचा शेला करून परमेश्वरालाच अर्पिला पाहिजे.
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. द. ता. भोसले
ज्ञानेश्वरांचे निवडक शंभर अभंग
सौजन्य- प्रतिमा प्रकाशन, पुणे.
* ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.