आली आली सर ही ओली
आली आली सर ही ओली
फुलवित धुंद अशी बरसात
छुम् छुम् पैंजण पायी बांधून सजले मी दिनरात
मला प्रीतीची झाली बाधा
गोकुळची झाले राधा
नंदनवन फुलले, फुलले माझिया हृदयात
हसते मजला यमुनेचे जळ
कदंब हसतो गाली अवखळ
हरीची मुरली मधुर छेडिते धून नवी अधरात
दृष्ट लागू नये सौख्याला
अनुपम या सौभाग्याला
मोद मनीमानसी दाटे, मावेना गगनात
फुलवित धुंद अशी बरसात
छुम् छुम् पैंजण पायी बांधून सजले मी दिनरात
मला प्रीतीची झाली बाधा
गोकुळची झाले राधा
नंदनवन फुलले, फुलले माझिया हृदयात
हसते मजला यमुनेचे जळ
कदंब हसतो गाली अवखळ
हरीची मुरली मधुर छेडिते धून नवी अधरात
दृष्ट लागू नये सौख्याला
अनुपम या सौभाग्याला
मोद मनीमानसी दाटे, मावेना गगनात
गीत | - | गंगाधर महाम्बरे |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | सोबती |
गीत प्रकार | - | चित्रगीत, ऋतू बरवा |
कदंब (कळंब) | - | वृक्षाचे नाव. |
मोद | - | आनंद |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.