मिटलेली मूठ तुझी
मिटलेली मूठ तुझी जगी जन्मताना
उघडी परि राहील ती विश्व सोडताना
गूढ बालपणीचे सारे अव्यक्त ठेविले
गुज कोवळ्या मूठीचे झाकून घेतले
कुणी तुझ्या जीवनाला घातला उखाणा
चाखिशी फळे कर्माची जशी कडूगोड रे
भविष्यात काय असावे हीच जीवा ओढ रे
स्वप्नीच्या धनाचा सारा छंद हा पुराणा
आली अखेरीस आता जीविताची यात्रा
अंती मानवाला मात्र मिळे एक मात्रा
नुरे सांगण्यास काही जीविच्या जीवना
उघडी परि राहील ती विश्व सोडताना
गूढ बालपणीचे सारे अव्यक्त ठेविले
गुज कोवळ्या मूठीचे झाकून घेतले
कुणी तुझ्या जीवनाला घातला उखाणा
चाखिशी फळे कर्माची जशी कडूगोड रे
भविष्यात काय असावे हीच जीवा ओढ रे
स्वप्नीच्या धनाचा सारा छंद हा पुराणा
आली अखेरीस आता जीविताची यात्रा
अंती मानवाला मात्र मिळे एक मात्रा
नुरे सांगण्यास काही जीविच्या जीवना
गीत | - | गंगाधर महाम्बरे |
संगीत | - | दत्ता डावजेकर |
स्वर | - | जयवंत कुलकर्णी |
गीत प्रकार | - | भावगीत |
गुज | - | गुप्त गोष्ट, कानगोष्ट. |
नुरणे | - | न उरणे. |
सुम | - | फूल. |
सान | - | लहान. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.