आतां कोठें धांवे मन
आतां कोठें धांवे मन ।
तुझे चरण देखिलिया ॥१॥
भाग गेला सीण गेला ।
अवघा जाला आनंद ॥२॥
प्रेमरसें बैसली मिठी ।
आवडी लाठी मुखाशी ॥३॥
तुका ह्मणे आह्मां जोगें ।
विठ्ठला घोगें खरें माप ॥४॥
तुझे चरण देखिलिया ॥१॥
भाग गेला सीण गेला ।
अवघा जाला आनंद ॥२॥
प्रेमरसें बैसली मिठी ।
आवडी लाठी मुखाशी ॥३॥
तुका ह्मणे आह्मां जोगें ।
विठ्ठला घोगें खरें माप ॥४॥
गीत | - | संत तुकाराम |
संगीत | - | राम फाटक |
स्वर | - | पं. भीमसेन जोशी |
गीत प्रकार | - | संतवाणी, विठ्ठल विठ्ठल, मना तुझे मनोगत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.