मी राधिका मी प्रेमिका
मी राधिका मी प्रेमिका
तन श्याम मन श्याम, प्राणसखा घनश्याम
रंगले जयाचे रंगी
मी राधिका मी प्रेमिका
अपरात्री कुंजवनी, सूर मधुर जाग मनी
कळेना सुचेना, माझी मी उरेना
साहवेना, मीलनासी आतुरले
मी राधिका मी प्रेमिका
श्यामरंग श्यामसंग, मीलनात चित्तदंग
सुखाच्या क्षणीही, मोहुनी वाजे ही
मनवीणा, मंत्रमुग्ध मोहरले
मी राधिका मी प्रेमिका
येई भान तृप्त गात्र, गोकुळी पहाट मात्र
कुणा हे सांगू मी, कसे हे सांगू मी
उमजेना, श्यामक्षण जगले
मी राधिका मी प्रेमिका
तन श्याम मन श्याम, प्राणसखा घनश्याम
रंगले जयाचे रंगी
मी राधिका मी प्रेमिका
अपरात्री कुंजवनी, सूर मधुर जाग मनी
कळेना सुचेना, माझी मी उरेना
साहवेना, मीलनासी आतुरले
मी राधिका मी प्रेमिका
श्यामरंग श्यामसंग, मीलनात चित्तदंग
सुखाच्या क्षणीही, मोहुनी वाजे ही
मनवीणा, मंत्रमुग्ध मोहरले
मी राधिका मी प्रेमिका
येई भान तृप्त गात्र, गोकुळी पहाट मात्र
कुणा हे सांगू मी, कसे हे सांगू मी
उमजेना, श्यामक्षण जगले
मी राधिका मी प्रेमिका
गीत | - | नितीन आखवे |
संगीत | - | श्रीधर फडके |
स्वर | - | आरती अंकलीकर-टिकेकर |
राग | - | मधुकंस |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.