कोप-शाप निज वाणी करो कच ।
तरूहि पिताचि गमो मजला ॥
गीत | - | कृ. प्र. खाडिलकर |
संगीत | - | गंधर्व नाटक मंडळी, हिराबाई बडोदेकर |
स्वर | - | हिराबाई बडोदेकर |
नाटक | - | विद्याहरण |
राग | - | सारंग |
ताल | - | केरवा |
चाल | - | जमुनातट |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
कच | - | केस / बृहस्पतीपुत्र. हा पुष्कळ दिवस शुक्राचार्यांजवळ राहून संजीवनी विद्या शिकला. शुक्राचार्यांच्या कन्येचे, देवयानीचे, याच्यावर प्रेम होते. |
तरुवर | - | तरू / झाड. |
शुक्राचार्यांना स्वतःचे शिष्यवृंदाबद्दल व सांप्रदायाबद्दल अपत्यस्नेहाचे तोडीचा अभिमान वाटत होता, आणि त्यांचा शिष्यवृंद स्वहिताविषयीं नेहमीं दक्ष होता; अशा अभिमानाच्या व दक्षतेच्या तटबंदींत कोंडून ठेवलेली संजीवनी विद्या देवांच्या बाजूला कशी गेली? या विद्येचें हरण करितांना कचाचे कार्यनिष्ठेला देवयानीच्या दिव्य प्रेमाची मदत मिळाली, दैत्यांच्या फाजील दक्षतेंतील अविचाराचा पाठिंबा मिळाला व आचार्यांच्या सुरापानाचे व्यसनामुळें तटबंदीचे दरवाजे खुले झाले.
'विद्याहरणा'ची ही कथा नीट समजण्याकरितां व त्यांतील रसाचा परिपाक होण्याकरितां सांखळींतील निरनिराळ्या दुव्यांना योग्य वळण द्यावे लागले. शिवाय मद्यपानाबद्दल तिटकारा उत्पन्न करून मद्यपाननिषेधाच्या विषयाची नाट्यदृष्टीने पूर्तता व्हावी म्हणून मद्याधीन 'शिष्यवरा'चे हास्यरसाची जोड पौराणिक पात्रांना द्यावी लागली.
'मानापमान' नाटकाप्रमाणें ह्याहि नाटकांत गायकी चालींचाच उपयोग केला आहे. ह्या चाली प्रि. भास्करराव बखले, आणि 'गंधर्व नाटक मंडळी'चे मालक रा. नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व, रा गोविंदराव टेंबे व रा. गणपतराव बोडस यांजकडून मुख्यतः घेतल्या आहेत. चालींसंबंधाने केलेल्या मदतीबद्दल यांचा मी फार आभारी आहे.
(संपादित)
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
दि. २० नोव्हेंबर १९१३
'संगीत विद्याहरण' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- यशवंत कृष्ण खाडिलकर (प्रकाशक)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.