मी राधा मीच कृष्ण
मी राधा, मीच कृष्ण
एकरूप झालें
मी गोकूळ, मी यमुना
मीच गोप, व्रजललना
जसुमति मी, मीच नन्द
द्वैत तें निमाले
नवविकसित कमल मीच
पुष्पगंध मी विमल मीच
मीच पवन उपवनिं जो
मंद मंद चाले
मी मधुवन, मी मुरली
कुंजवनीं जी भरली
एक असुनि मी अनेक
वेश नटुनि आलें
एकरूप झालें
मी गोकूळ, मी यमुना
मीच गोप, व्रजललना
जसुमति मी, मीच नन्द
द्वैत तें निमाले
नवविकसित कमल मीच
पुष्पगंध मी विमल मीच
मीच पवन उपवनिं जो
मंद मंद चाले
मी मधुवन, मी मुरली
कुंजवनीं जी भरली
एक असुनि मी अनेक
वेश नटुनि आलें
गीत | - | गो. नि. दांडेकर |
संगीत | - | स्नेहल भाटकर |
स्वर | - | ज्योत्स्ना भोळे |
नाटक | - | राधामाई |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, नाट्यसंगीत |
उपवन | - | बाग, उद्यान. |
विमल | - | स्वच्छ / निर्मल / पवित्र / पांढरा / सुंदर. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.