मी फसले ग फसले
मी फसले ग फसले
तरीही सुखावले
किती निर्मळ तो साधा भोळा
मी ओळखिले नाही त्याला
माझे मन मजसी ना कळले
मी माझ्यातच होते दंग
ये नकळत प्रीतीला रंग
माझ्याही नकळत मी भुलले
जे स्वप्नीही ना पाहिले
ते अवचित सामोरे आले
सारेच मनाजोगे घडले
तरीही सुखावले
किती निर्मळ तो साधा भोळा
मी ओळखिले नाही त्याला
माझे मन मजसी ना कळले
मी माझ्यातच होते दंग
ये नकळत प्रीतीला रंग
माझ्याही नकळत मी भुलले
जे स्वप्नीही ना पाहिले
ते अवचित सामोरे आले
सारेच मनाजोगे घडले
गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | भास्कर चंदावरकर |
स्वर | - | अनुराधा पौडवाल |
चित्रपट | - | एक डाव भुताचा |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.