मी काय करू माझे चुकले
मी काय करू माझे चुकले?
कांचनमृग मज हवेच म्हंटले !
माझ्यासाठी रघुवीर माझे
धावुनी गेले हरिणामागे
दुर्दैवाचे धरुनी धागे संकट माझे मीच ओढिले !
वाटेवरती नेत्र लावुनी
उभी एकली मी गहिवरुनी
दु:ख सारखे डोळ्यांमधुनी क्षणाक्षणाला बोलू लागले !
नसते दिसले हरिण मला ते
मीही मोहुनी गेले नसते
ध्यानीमनी मज ठाऊक नव्हते, नसते अवचित कधीही घडले !

गीत | - | |
संगीत | - | |
स्वर | - | आशालता वाबगावकर |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.