मी हरणुलि होईन
मी हरणुलि होईन !
चौखुर धावेन, मुरडत मिरवीन
तू परि येता, वनि लपुनी तुज न गवसेन !
मी चांदणी होईन !
चमचम चमकेन, नटुनी नाचेन
तू परि येता, नभी लपुनी तुज न गवसेन !
मी मासुळी होईन !
जळात खेळेन, शिंपली शोधेन
तू परि येता, मोती बनुनी तुज न गवसेन !
चौखुर धावेन, मुरडत मिरवीन
तू परि येता, वनि लपुनी तुज न गवसेन !
मी चांदणी होईन !
चमचम चमकेन, नटुनी नाचेन
तू परि येता, नभी लपुनी तुज न गवसेन !
मी मासुळी होईन !
जळात खेळेन, शिंपली शोधेन
तू परि येता, मोती बनुनी तुज न गवसेन !
गीत | - | वि. स. खांडेकर |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | अंतरीचा दिवा |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
टीप - • एका पारंपरिक गीताच्या आधारे हे गीत वि. स खांडेकर यांनी लिहिले आहे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.