A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अवतीभवती डोंगर झाडी

अवतीभवती डोंगर झाडी, मधी माझी ग सासुरवाडी
दोन मजली रंगीत माडी, दारी बांधली बैलांची जोडी

( हिचा भरतार तालेवार तालुक्याचा सावकार
गोड बोल्या गंगाराम, गडी गावात रुबाबदार )

दोन डोंगरामधली वाट, वर चढाया अवघड घाट
घोडं घेऊन मुराळी आला, मी निघाले नांदायाला
नवी कोरी नेसून साडी

घोडं चालतंय दिडकी चाल, झोकं घेतात कानात डुल
माझ्या गळ्यात वजरटिका ग, नाकी नथीनं धरलाय ठेका
घातली हौसेनं सोन्याची बुगडी

सख्या संगती एकान्‍तात, प्रीत फुलंल अंधारात
हुईल काळजात गोड गुदगुली, लाल होतील गाल मखमली
मिळंल मिठीत मधाची गोडी