A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
म्हातारा इतुका न अवघें

म्हातारा इतुका न अवघें पाऊणशें वयमान ।
लग्‍ना अजुनि लहान ॥

दंताजीचें ठाणें उठलें, फुटले दोन्ही कान ।
डोळे रुसले कांहिं न बघती नन्‍ना म्हणते मान ॥

तुरळक कोठें केस रुपेरी, डोइस टक्कल छान ।
भार वयाचा वाहुनि वाहुनि कंबर होय कमान ॥

काठीवांचुनि नेट न पाया परि मोठें अवसान ।
उसनी घेउनि ऐट चालतां काय दिसें तें ध्यान ॥