मार्ग लाभो पावलांना
मार्ग लाभो पावलांना ही तृणाची याचना
लाभु दे ऐसा वसा की जन्म होवो प्रार्थना
जन्मती जन्मासवे काही रूढींची बंधने
दोर नियमांचे जखडती हे मनाचे चांदणे
संपु दे त्याच्या व्रताने ही युगाची वंचना
जाणत्यांचा धर्म असतो माणसाला जाणणे
आपल्या आतील दु:खे स्वेतरांतून वाचणे
सार सार्या धर्मपंथांचे असे सहवेदना
काय जे जमिनीवरी आहेत ते मातीतले?
का तयांना वर्ज्य हे आनंद या वार्यातले
लाभु दे अवकाश त्यांसी ही मनाला सांत्वना
लाभु दे ऐसा वसा की जन्म होवो प्रार्थना
जन्मती जन्मासवे काही रूढींची बंधने
दोर नियमांचे जखडती हे मनाचे चांदणे
संपु दे त्याच्या व्रताने ही युगाची वंचना
जाणत्यांचा धर्म असतो माणसाला जाणणे
आपल्या आतील दु:खे स्वेतरांतून वाचणे
सार सार्या धर्मपंथांचे असे सहवेदना
काय जे जमिनीवरी आहेत ते मातीतले?
का तयांना वर्ज्य हे आनंद या वार्यातले
लाभु दे अवकाश त्यांसी ही मनाला सांत्वना
गीत | - | अरुण म्हात्रे |
संगीत | - | निलेश मोहरीर |
स्वर | - | जान्हवी प्रभू-अरोरा |
गीत प्रकार | - | प्रार्थना, मालिका गीत |
टीप - • मालिका गीत- उंच माझा झोका, वाहिनी- झी मराठी. |
तृण | - | गवत. |
वंचना | - | फसवणूक. |
स्वेतर | - | स्व + इतर. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.