असा नेसून शालू हिरवा
असा नेसून शालू हिरवा आणि वेणीत खूपसुन मरवा
जासी कुणीकडे कुणाकडे, सखे सांग ना
का ग बघतेस मागेपुढे?
का रे वाटेत गाठून पुसशी, का रे निलाजर्या तू हसशी
जाते सख्याकडे प्रियाकडे, तुला सांगते
त्याची माझी रे प्रीत जडे
तुजपरी गोरीगोरी, चाफ्यावानी सुकुमारी
दुपारचा पार, ऊन जळते ग वर ऊन जळते
टकमक बघू नको, जाऊ नको तिच्या वाटे
का रे उठठेव, तिला कळते रे तिची तिला कळते
का ग आला असा फणकारा, कंकणाच्या करीत झणकारा
जासी कुणीकडे कुणाकडे, सखे सांग ना
का ग बघतेस मागेपुढे?
दूर डोंगरी घुमते बासरी, चैत बहरला वनामधी रे वनामधी
पदर फडफडतो ऊर धडधडतो, प्रीत उजळते मनामधी बघ मनामधी
मी भल्या घरातील युवती, लोक फिरतात अवतीभवती
जाते सख्याकडे प्रियाकडे, खरं सांगते
म्हणून बघते मी मागेपुढे

गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | मास्टर कृष्णराव |
स्वर | - | लता मंगेशकर, सुधीर फडके |
चित्रपट | - | कीचकवध |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी, युगुलगीत |
चैत | - | चैत्र. |
मरवा | - | सुगंधी पाने असलेली एक वनस्पती. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.