माणूस तुझे नाव
कशासाठी आटापिटी, कुठे तुझी धाव?
माणूस तुझे नाव !
नाशवंत दौलतीची धरुनिया आस
भोळ्या-खुळ्या जिवांना का लावितोस फास
बाहेरचा चोर जरी घरामधे साव
माणूस तुझे नाव !
विकोनिया देव कोणी जगे भक्त खोटा
कसाबाला गाय विकी कुणी तो करंटा
नारीच्या जिवावरी रंक बने राव
माणूस तुझे नाव !
तुझ्याहुनी जात बरी श्वान-मांजराची
इमानानं करती रे राखणी घराची
विसरलास वाट तुझी, पुण्य तुझा गाव
माणूस तुझे नाव !
माणूस तुझे नाव !
नाशवंत दौलतीची धरुनिया आस
भोळ्या-खुळ्या जिवांना का लावितोस फास
बाहेरचा चोर जरी घरामधे साव
माणूस तुझे नाव !
विकोनिया देव कोणी जगे भक्त खोटा
कसाबाला गाय विकी कुणी तो करंटा
नारीच्या जिवावरी रंक बने राव
माणूस तुझे नाव !
तुझ्याहुनी जात बरी श्वान-मांजराची
इमानानं करती रे राखणी घराची
विसरलास वाट तुझी, पुण्य तुझा गाव
माणूस तुझे नाव !
गीत | - | यशवंत देव |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | कैलासनाथ जैस्वाल |
गीत प्रकार | - | भावगीत |
श्वान | - | कुत्रा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.