A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मनींचें मनिंच राहिलें आंत

बोलत बोलत उगीच काहितरि
जरी उलटली रात
पलटली आता होत प्रभात
मनींचें मनिंच राहिलें आंत

चुकवित दृष्टिस दृष्टि राहिली
ओळख काळोखांत
मिसळुनि जात अता सकळांत
मनींचें मनिंच राहिलें आंत

ओठांवरुनी आशय फिरला
परत पुन्हा हृदयांत
घुटमळे जो आता शब्दांत
मनींचें मनिंच राहिलें आंत

भुलवित निजपण तरिही दुजेपण
उरवित एकान्‍तांत
विसर ज्याचा पडतो जगतांत
मनींचे मनिंच राहिलें आंत
गीत - कवी अनिल
संगीत - सुधीर मोघे
स्वर- रवींद्र साठे, विभावरी आपटे-जोशी
गीत प्रकार - भावगीत, युगुलगीत, मना तुझे मनोगत
  
टीप -
• काव्य रचना- १३ सप्टेंबर १९५३, नीलोखेडे.
प्रभात - पहाट.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  रवींद्र साठे, विभावरी आपटे-जोशी