मनी वसे जे स्वप्नी दिसे
मनी वसे जे स्वप्नी दिसे
ते अवचित बाई असे, गवसले कसे?
नील नभाच्या कमळाखाली
रात चांदणी दिवसा फुलली
पानोपानी त्याच तरूतळी, तेच तेच कवडसे
पुष्पकरांचा विळखा घालुनी
जीव जिवाला बसे बिलगुनी
शहारुनी त्या गोड आठवणी, मनात मनही हसे
ते अवचित बाई असे, गवसले कसे?
नील नभाच्या कमळाखाली
रात चांदणी दिवसा फुलली
पानोपानी त्याच तरूतळी, तेच तेच कवडसे
पुष्पकरांचा विळखा घालुनी
जीव जिवाला बसे बिलगुनी
शहारुनी त्या गोड आठवणी, मनात मनही हसे
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत देसाई |
स्वर | - | मीना खडीकर |
चित्रपट | - | कांचनगंगा |
गीत प्रकार | - | मना तुझे मनोगत, चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.