मंदिरात अंतरात तोच (१)
मंदिरात अंतरात
तोच नांदत आहे
नाना देही नाना रूपी तुझा देव आहे
तोच मंगलाची मूर्ती
तोच विठ्ठलाची कीर्ती
तोच श्याम तोच राम दत्तधाम आहे
संतांचिया कीर्तनात
साधकांच्या चिंतनात
तोच ध्यास तोच आस तोच श्वास आहे
तोच बाल्य तारुण्यही
वार्धक्याचा विश्रामही
तोच ऐल तोच पैल आदि-अंत आहे
तोच नांदत आहे
नाना देही नाना रूपी तुझा देव आहे
तोच मंगलाची मूर्ती
तोच विठ्ठलाची कीर्ती
तोच श्याम तोच राम दत्तधाम आहे
संतांचिया कीर्तनात
साधकांच्या चिंतनात
तोच ध्यास तोच आस तोच श्वास आहे
तोच बाल्य तारुण्यही
वार्धक्याचा विश्रामही
तोच ऐल तोच पैल आदि-अंत आहे
गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | सुधीर फडके, उत्तरा केळकर |
चित्रपट | - | धाकटी सून |
गीत प्रकार | - | भक्तीगीत, चित्रगीत |
आदि (आधी) | - | प्रारंभ / प्रमुख. |
काहिली | - | उकाडा / आग / तळमळ. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.