मानत नाही श्याम
मानत नाही श्याम
मन पापी मानत नाही !
लाज सांडिली, त्यजिली भीती
अदय प्रियावर केली प्रीती
निशिदिनि चैन न काही !
भुलले त्याला पडले मोही
सहज विसरला तो निर्मोही
स्मरणी आणित राही मी
मन पापी मानत नाही !
मन पापी मानत नाही !
लाज सांडिली, त्यजिली भीती
अदय प्रियावर केली प्रीती
निशिदिनि चैन न काही !
भुलले त्याला पडले मोही
सहज विसरला तो निर्मोही
स्मरणी आणित राही मी
मन पापी मानत नाही !
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | पं. जितेंद्र अभिषेकी |
स्वर | - | क्षमा बाजीकर |
नाटक | - | हे बंध रेशमाचे |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, नाट्यसंगीत, मना तुझे मनोगत |
निशिदिनी | - | अहोरात्र. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.