A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मानसी

कशी वेल्हाळ वेल्हाळ, त्यांना हवीशी हवीशी
सार्‍या सख्या सजणींचे मन मानसी मानसी !

कुणी थोडी स्वप्‍नवेडी, कुणी कर्तव्यकठोर
कुणा आकाशाची ओढ, कुणा जमिनीचा घोर
कुणा जगण्याची धुंदी तरी धुंदीतही भान
कुणी स्वत:मध्ये मग्‍न तरी ढळते न ध्यान
अशा सख्या सजणींचे मन मानसी मानसी !

हिच्या तरल भावना, ती कर्तव्याशी ठाम
हिला आसवे ही प्रिय, तिला आवडतो घाम
हिचा नेहमी गोंधळ, ती चतुर चतुर
हिचे सारेच नेटके, तिचे थातुरमातूर
एक डौलदार शेत, एक पसरले रान
एक लयबध्द चाल, एक धावते बेभान
हिचा अस्ताव्यस्त चारा, तिचा बांधलेला भारा
हिचा भटकता ग्रह, तिचा निश्चलसा वारा !
कुणी गाणे वृत्तबद्ध, कुणी स्वैर मुक्तछंद
कुणा नाही ग निर्बंध, कुणी जीवनात बंद
अशा सख्या सजणींचे मन मानसी मानसी !

"दोन क्षण आनंदाचा, तिच्या 'आपल्या' जगाचा
एक सोहळा मनीचा, प्रिय सखी मानसीचा !
फुलपाखरी मनाला छंद मध चाखण्याचा
मनं रिती रिती होता मग भरून येण्याचा !
एक सोहळा मनीच, प्रिय सखी मानसीचा !"

मनाचा हा गुंता राणी जरी सुटता सुटेना
फिरुनी या वाटेवरी जीव होई सुनासुना !
कमळच्या फुलापरी अशी मनाची ग भ्रांत
मानसीच्या भेटीलागी जसे अभंग निवान्त !
गीत - मंगेश कुळकर्णी
संगीत - अशोक पत्की
स्वर- देवकी पंडित
गीत प्रकार - मालिका गीत
  
टीप -
• शीर्षक गीत, मालिका- मानसी, वाहिनी- झी मराठी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.