मनाला झाली कृष्ण सख्याची
छुमछुम पायी वाजे घुंगुर
गिरकी घेता फिरते अंबर
ताल धिनक्धिन भिनला अंगी
गोपी भिजल्या हरीच्या रंगी
वेडी झाली राधा
मनाला झाली कृष्ण सख्याची बाधा !
यमुनेच्या त्या तीरावरती गोपी
अशा जलक्रीडा करिती
अवचित येता कृष्ण कन्हैय्या झाली त्रेधा त्रेधा
मनाला झाली कृष्ण सख्याची बाधा !
नटखट कान्हा खोड्या करितो
फोडुनी मटका लोणी चोरितो
रागे भरिता गोड हासुनी लावितसे गोकुळ नादा
मनाला झाली कृष्ण सख्याची बाधा !
गिरकी घेता फिरते अंबर
ताल धिनक्धिन भिनला अंगी
गोपी भिजल्या हरीच्या रंगी
वेडी झाली राधा
मनाला झाली कृष्ण सख्याची बाधा !
यमुनेच्या त्या तीरावरती गोपी
अशा जलक्रीडा करिती
अवचित येता कृष्ण कन्हैय्या झाली त्रेधा त्रेधा
मनाला झाली कृष्ण सख्याची बाधा !
नटखट कान्हा खोड्या करितो
फोडुनी मटका लोणी चोरितो
रागे भरिता गोड हासुनी लावितसे गोकुळ नादा
मनाला झाली कृष्ण सख्याची बाधा !
गीत | - | श्रीरंग गोडबोले |
संगीत | - | अजित-अतुल-समीर |
स्वर | - | माधुरी करमरकर |
चित्रपट | - | दे धक्का !! |
गीत प्रकार | - | चित्रगीत, हे श्यामसुंदर, मना तुझे मनोगत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.