मजवरी माधव रुसला बाई
मजवरी माधव रुसला बाई, काही केल्या बोलत नाही
सोनपाऊले मी आसवांनी, न्हाऊ घातली करकमलांनी
पूजा बांधिली भावफुलांनी, उधळुनी मजला लोटुन देई
लगटुनि अंगा किती विनविले, बोल नाही तर- मी पण रुसले
रुसता रुसता मधेच हसले, हरि गोजिरा- हसला नाही
तव हृदयाची चोरी केली, राधेची का आगळिक झाली
अनंत हृदये तुवा चोरिली, राग कधी कुणी धरला नाही

गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | आशा भोसले |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भावगीत |
आगळिक | - | मर्यादेचे उल्लंघन. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.