A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माझ्या वडिलांची मिरासी

माझ्या वडिलांची मिरासी गा देवा ।
तुझी चरण सेवा पांडुरंगा ॥१॥

उपवास पारणे राखिला दारवंटा ।
केला भोगवटा आह्मां लागी ॥२॥

वंश परंपरा दास मी अंकिता ।
तुका मोकलिता लाज कोणा ॥३॥