कधी तू दिसशील डोळ्यांपुढे
कधी तू दिसशील डोळ्यांपुढे
तुझ्यावाचून सुचे न काही, वेड जिवाला जडे
स्वप्नी येसी, जवळ बैसशी
स्पर्शभास तो तुझा तनुशी
एकान्तीही मधूर स्वर तुझा अवचित कानी पडे
उपभोगाविण अवीट माधुरी
उठवी ओलसर रेखा अधरी
तव श्वासांच्या गंधास्तव पण श्वासच माझा अडे
आसुसली तनु आलिंगनासी
मधुमीलन हा ध्यास मनासी
चिरवांच्छीत हा योग सुमंगल, का नच अजुनी घडे?
तुझ्यावाचून सुचे न काही, वेड जिवाला जडे
स्वप्नी येसी, जवळ बैसशी
स्पर्शभास तो तुझा तनुशी
एकान्तीही मधूर स्वर तुझा अवचित कानी पडे
उपभोगाविण अवीट माधुरी
उठवी ओलसर रेखा अधरी
तव श्वासांच्या गंधास्तव पण श्वासच माझा अडे
आसुसली तनु आलिंगनासी
मधुमीलन हा ध्यास मनासी
चिरवांच्छीत हा योग सुमंगल, का नच अजुनी घडे?
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | वर्हाडी आणि वाजंत्री |
गीत प्रकार | - | चित्रगीत, नयनांच्या कोंदणी |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.