A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गड्या रे प्रपंच हा

गड्या रे प्रपंच हा लटका
गुरफटता मायाजालि नाहि रे सुटका

कामिनी रूपसुंदरा
धनदौलत येई घरा
उदराचा भरशी दरा
कुरवंडी करशी काढुनि काळिज कुटका
गड्या रे प्रपंच हा लटका

क्षणभंगुर सुख ओसरे
संसारी जीवन सरे
घडिघडी गळे पाझरे
किति जपशिल वेड्या देह कटोरा फुटका
गड्या रे प्रपंच हा लटका

तो दीनबंधु भूवरी
वैकुंठ करी पंढरी
आठवी सावळा हरी
हरिनाम करील भवपार जिवाची सुटका
गड्या रे प्रपंच हा लटका