उद्धवा अजब तुझे सरकार
उद्धवा, अजब तुझे सरकार !
लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार !
इथे फुलांना मरण जन्मता
दगडाला पण चिरंजीविता
बोरिबाभळी उगाच जगती, चंदनमाथी कुठार !
लबाड जोडिती इमले-माड्या
गुणवंतांना मात्र झोपड्या
पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार !
वाईट तितुके इथे पोसले
भलेपणाचे भाग्य नासले
या पृथ्वीच्या पाठीवर ना माणसास आधार !
लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार !
इथे फुलांना मरण जन्मता
दगडाला पण चिरंजीविता
बोरिबाभळी उगाच जगती, चंदनमाथी कुठार !
लबाड जोडिती इमले-माड्या
गुणवंतांना मात्र झोपड्या
पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार !
वाईट तितुके इथे पोसले
भलेपणाचे भाग्य नासले
या पृथ्वीच्या पाठीवर ना माणसास आधार !
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | सुधीर फडके |
चित्रपट | - | जगाच्या पाठीवर |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
इमला | - | घर. |
उद्धव (ऊधो) | - | वसुदेवाचा पुतण्या, कृष्णसखा. |
कुठार | - | कुर्हाड. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.