माझ्या मायेच्या माहेरा
माझ्या मायेच्या माहेरा मला कधी नेसी?
मायबाप विठ्ठला रे, कधी भेट देसी?
रामकृष्ण हरी ! रामकृष्ण हरी !
ज्ञानियांचा राजा तुझा बाळ लडिवाळ
अवघे वैष्णव तुझे लाडके गोपाळ
मला एकलीला का रे, दूर मोकलीसी?
मायबाप विठ्ठला रे, कधी भेट देसी?
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा
रामकृष्ण हरी ! रामकृष्ण हरी !
टाळ मृदंगाची साथ नामाचा सोहळा
भीवरेच्या तीरी नाचे धुंद संतमेळा
दुरावले कैशी देवा मीच दर्शनासी?
मायबाप विठ्ठला रे, कधी भेट देसी?
मायबाप विठ्ठला रे, कधी भेट देसी?
रामकृष्ण हरी ! रामकृष्ण हरी !
ज्ञानियांचा राजा तुझा बाळ लडिवाळ
अवघे वैष्णव तुझे लाडके गोपाळ
मला एकलीला का रे, दूर मोकलीसी?
मायबाप विठ्ठला रे, कधी भेट देसी?
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा
रामकृष्ण हरी ! रामकृष्ण हरी !
टाळ मृदंगाची साथ नामाचा सोहळा
भीवरेच्या तीरी नाचे धुंद संतमेळा
दुरावले कैशी देवा मीच दर्शनासी?
मायबाप विठ्ठला रे, कधी भेट देसी?
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | रूप पाहता लोचनी |
गीत प्रकार | - | चित्रगीत, विठ्ठल विठ्ठल |
बरवा | - | सुंदर / छान. |
भीवरेच्या | - | भीमा नदीच्या. |
मोकलणे | - | पाठविणे / मोकळा सोडणे. |
वैष्णव | - | विष्णुभक्त. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.