चांदणे निळे टिपूर
चांदणे निळे टिपूर धुंद चहूकडे
ये मिठीत, ये दिठीत आज तू गडे
रसाळ या तुझ्या स्वरांत सौख्य साठले
एक फूल, स्पर्शभूल स्वप्न वाटले
दूर अंबरात चंद्रपाखरू उडे
भासतो प्रशांत मंद गारवा जरा
चारुशिल्प मोहवी मदीय अंतरा
जीव शालिनी असा तुझ्यावरी जडे
उरात गीत छेड तू सुरेल झंकृती
स्मृतीत राहू दे प्रिये सुरेख ही कृती
दंवात पारिजात शुभ्र घालतो सडे
ये मिठीत, ये दिठीत आज तू गडे
रसाळ या तुझ्या स्वरांत सौख्य साठले
एक फूल, स्पर्शभूल स्वप्न वाटले
दूर अंबरात चंद्रपाखरू उडे
भासतो प्रशांत मंद गारवा जरा
चारुशिल्प मोहवी मदीय अंतरा
जीव शालिनी असा तुझ्यावरी जडे
उरात गीत छेड तू सुरेल झंकृती
स्मृतीत राहू दे प्रिये सुरेख ही कृती
दंवात पारिजात शुभ्र घालतो सडे
गीत | - | गुरुनाथ शेणई |
संगीत | - | भानुकांत लुकतुके |
स्वर | - | वसंत आजगांवकर |
गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, भावगीत |
चारू | - | सुंदर. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.