मनी अचानक हलले काही
मनी अचानक हलले काही
वार्यावर दरवळले काही
भरती येता उधाणलेली
लाट आतुनी शहारलेली
सावरताना ढळले काही
गंध दिवाणा स्पर्श पाहुणा
हवा कशाला नवा बहाणा
नजरेमधुनी कळले काही
तू असण्याचा धुंद केवडा
तू नसताना दिवस बापुडा
शब्दांमधुनी ओघळले काही
हात हाती हा विश्वासाचा
अर्थ सांगतो सहवासाचा
सखेसोबती आकळले काही
वार्यावर दरवळले काही
भरती येता उधाणलेली
लाट आतुनी शहारलेली
सावरताना ढळले काही
गंध दिवाणा स्पर्श पाहुणा
हवा कशाला नवा बहाणा
नजरेमधुनी कळले काही
तू असण्याचा धुंद केवडा
तू नसताना दिवस बापुडा
शब्दांमधुनी ओघळले काही
हात हाती हा विश्वासाचा
अर्थ सांगतो सहवासाचा
सखेसोबती आकळले काही
गीत | - | दासू |
संगीत | - | मंगेश धाकडे |
स्वर | - | कीर्ती किल्लेदार, मंगेश धाकडे |
चित्रपट | - | दुसरी गोष्ट |
गीत प्रकार | - | मना तुझे मनोगत, चित्रगीत, युगुलगीत |
आकळणे | - | आकलन होणे, समजणे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.