A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माझ्या मना लागो छंद

माझ्या मना लागो छंद ।
गोविंद, नित्य गोविंद ॥१॥

तेणें देह ब्रह्मरूप गोविंद ।
निरसेल नामरूप, गोविंद ॥२॥

तुटेल सकळ उपाधि ।
निरसेल आधि-व्याधी, गोविंद ॥३॥

गोविंद हा जनीं-वनीं ।
ह्मणे एका जनार्दनीं ॥४॥