आज दिसे का चंद्र गुलाबी
आज दिसे का चंद्र गुलाबी?
हवेस येतो गंध शराबी
अष्टमीच्या या अर्ध्या राती
तुझी नि माझी फुलली प्रीती
अर्धे मिटले अर्धे उघडे
या नयनांतुन स्वप्न उलगडे
तळहातावर भाग्य उतरले
हात तुझा रे माझ्या हाती
स्वप्नी तुझ्या मी येता राणी
दुनिया झाली स्वप्नदेखणी
बघ दोघांचे घरकुल अपुले
निशिगंधाची बाग सभोंती
अर्धी मिटली अर्धी उघडी
खिडकी मजसी दिसे तेवढी
अनुरागाच्या मंजुळ ताना
कर्णफुलासम कानी येती
या स्वप्नातच जीव भरावा
कैफ असा हा नित्य उरावा
अशीच व्हावी संगमरवरी
अर्धोन्मीलित अपुली नाती
हवेस येतो गंध शराबी
अष्टमीच्या या अर्ध्या राती
तुझी नि माझी फुलली प्रीती
अर्धे मिटले अर्धे उघडे
या नयनांतुन स्वप्न उलगडे
तळहातावर भाग्य उतरले
हात तुझा रे माझ्या हाती
स्वप्नी तुझ्या मी येता राणी
दुनिया झाली स्वप्नदेखणी
बघ दोघांचे घरकुल अपुले
निशिगंधाची बाग सभोंती
अर्धी मिटली अर्धी उघडी
खिडकी मजसी दिसे तेवढी
अनुरागाच्या मंजुळ ताना
कर्णफुलासम कानी येती
या स्वप्नातच जीव भरावा
कैफ असा हा नित्य उरावा
अशीच व्हावी संगमरवरी
अर्धोन्मीलित अपुली नाती
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | वसंत पवार |
स्वर | - | आशा भोसले, पं. वसंतराव देशपांडे |
चित्रपट | - | वैजयंता |
गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, चित्रगीत, युगुलगीत |
अनुराग | - | प्रेम, निष्ठा. |
उन्मीलित | - | उमलणे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.