माझ्या कोंबड्याची शान
माझ्या कोंबड्याची शान
कोंबड्याची शान, माझ्या कोंबड्याची शान
छाती काढून चाले तुरतुरा
तुरा डोईवर छान
भल्या पहाटे उठतो आपण, उंच घुमवितो तान
याचे गाणे ऐकून येते निजल्या जगता भान
पिळली जाई तोवर राही ताठच याची मान
घरी नांदता कुटुंब याचे अन्नाची ना वाण
संतानावर याच्या जगते देशाचे संतान
कोंबड्याची शान, माझ्या कोंबड्याची शान
छाती काढून चाले तुरतुरा
तुरा डोईवर छान
भल्या पहाटे उठतो आपण, उंच घुमवितो तान
याचे गाणे ऐकून येते निजल्या जगता भान
पिळली जाई तोवर राही ताठच याची मान
घरी नांदता कुटुंब याचे अन्नाची ना वाण
संतानावर याच्या जगते देशाचे संतान
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | पु. ल. देशपांडे |
स्वर | - | पं. वसंतराव देशपांडे |
चित्रपट | - | नवरा बायको |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.