माझ्या कपाळीचं कुंकु
माझ्या कपाळीचं कुंकु
कवतिकानं किती बाई निरखू
जीव भरंना भरंना भरंना
खरं वाटंना वाटंना वाटंना
कुण्या जल्मीची पावली पुण्याई
झाली परसन आई अंबाबाई
चिरी कुंकवाची लखलख निरखू
सुर्व्या सांजचा, चांद पुनवंचा
सर्गाची ग सोभा, दारी आनंद हुभा
चिरी कुंकवाची लखलख निरखू
टाकीन ववाळून हिरं मोती सोनं
पिर्ती मोलाचं कुंकवाचं लेणं
चिरी कुंकवाची लखलख निरखू
कवतिकानं किती बाई निरखू
जीव भरंना भरंना भरंना
खरं वाटंना वाटंना वाटंना
कुण्या जल्मीची पावली पुण्याई
झाली परसन आई अंबाबाई
चिरी कुंकवाची लखलख निरखू
सुर्व्या सांजचा, चांद पुनवंचा
सर्गाची ग सोभा, दारी आनंद हुभा
चिरी कुंकवाची लखलख निरखू
टाकीन ववाळून हिरं मोती सोनं
पिर्ती मोलाचं कुंकवाचं लेणं
चिरी कुंकवाची लखलख निरखू
गीत | - | योगेश |
संगीत | - | आनंदघन |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | तांबडी माती |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
चिरी | - | बारीक रेघ / कुंकू. |
जल्म | - | जन्म. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.