माझी उदास गीते
माझी उदास गीते तू ऐकतोस का रे?
अन् आसवांत माझ्या तू नाहतोस का रे?
येताच तू समोरी मी दर्वळून जाते
माझ्यासमान तूही गंधाळतोस का रे?
माझ्या मुक्या मनाच्या का छेडतोस तारा?
माझ्यासवेच तूही झंकारतोस का रे?
एकान्त जीवनाचा अंधारला असू दे !
तू अंतरात माझ्या तेजाळतोस का रे?
अन् आसवांत माझ्या तू नाहतोस का रे?
येताच तू समोरी मी दर्वळून जाते
माझ्यासमान तूही गंधाळतोस का रे?
माझ्या मुक्या मनाच्या का छेडतोस तारा?
माझ्यासवेच तूही झंकारतोस का रे?
एकान्त जीवनाचा अंधारला असू दे !
तू अंतरात माझ्या तेजाळतोस का रे?
गीत | - | सुरेश भट |
संगीत | - | आनंद मोडक |
स्वर | - | देवकी पंडित |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.