ज्ञानदेव बाळ माझा
ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता
लक्ष द्या हो विनवीते, मराठी मी त्याची माता
गोड माझ्या सोनुल्याचा लळा लागे बाळपणा
बांधुनीया घुंगुरवाळे अंगी नाचे थोरपणा
निरूपण सांगायाला तुम्ही द्या हो शहाणपणा
बाळमुखी मोठा घास भरवा हो जगन्नाथा
निरक्षर लोकांसाठी प्राणांचेही देऊन मोल
अमृताते जिंकित पैजा धावे मराठाची बोल
ज्ञानदीप डोळियांचे तेजाळता तेजोगोल
देवगुरु खाली आले जोडुनिया दोन्ही हाता
लक्ष द्या हो विनवीते, मराठी मी त्याची माता
गोड माझ्या सोनुल्याचा लळा लागे बाळपणा
बांधुनीया घुंगुरवाळे अंगी नाचे थोरपणा
निरूपण सांगायाला तुम्ही द्या हो शहाणपणा
बाळमुखी मोठा घास भरवा हो जगन्नाथा
निरक्षर लोकांसाठी प्राणांचेही देऊन मोल
अमृताते जिंकित पैजा धावे मराठाची बोल
ज्ञानदीप डोळियांचे तेजाळता तेजोगोल
देवगुरु खाली आले जोडुनिया दोन्ही हाता
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | आशा भोसले |
राग | - | भूप, नट |
गीत प्रकार | - | भावगीत |
घुंगुरवाळा | - | घुंगरे लावलेला लहान मुलाच्या पायांतला पैंजण. |
निरूपण | - | व्याख्यान / विवेचन. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.