माझा भाव तुझे चरणीं
माझा भाव तुझे चरणीं ।
तुझें रूप माझे नयनीं ॥१॥
सापडलों एकामेकां ।
जन्मोजन्मीं नोहे सुटका ॥२॥
त्वां मोडिली माझी माया ।
मी तो जडलों तुझिया पायां ॥३॥
त्वां मज मोकलिले विदेही ।
मी तुज घातले हृदयीं ॥४॥
नामा ह्मणे गा सुजाणा ।
सांग कोणे ठकविलें कोणा? ॥५॥
तुझें रूप माझे नयनीं ॥१॥
सापडलों एकामेकां ।
जन्मोजन्मीं नोहे सुटका ॥२॥
त्वां मोडिली माझी माया ।
मी तो जडलों तुझिया पायां ॥३॥
त्वां मज मोकलिले विदेही ।
मी तुज घातले हृदयीं ॥४॥
नामा ह्मणे गा सुजाणा ।
सांग कोणे ठकविलें कोणा? ॥५॥
गीत | - | संत नामदेव |
संगीत | - | राम फाटक |
स्वर | - | पं. भीमसेन जोशी |
राग | - | बागेश्री |
गीत प्रकार | - | संतवाणी, नयनांच्या कोंदणी |
ठकविणे | - | फसविणे. |
मोकलणे | - | पाठविणे / मोकळा सोडणे. |
विदेहस्थिति | - | देहाचे भान विसरवणारी, मुक्त अशी अध्यात्मिक (ज्ञानी) अवस्था, निर्विकल्प. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.