A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मज जन्म देइ माता

मज जन्म देइ माता । परि पोशिलें तुम्हीं ।
निजकन्यका गणोनी । न कांहीं केलें कमी ॥

उपकार जे जहाले । हिमाद्रितुंगसे ।
शत जन्म घेउनी ते । फेडीन काय मी ॥

सदया मनासि ठेवा । अपुल्या असे सदा ।
उपकारबद्ध तनया । तुमची पदे नमीं ॥