मज सुचले ग मंजुळ गाणे
मज सुचले ग, सुचले मंजुळ गाणे
हिंडता डोंगरापाठी सापडले कोरीव लेणे
विसरल्या उन्हातील वाटा, विसरले पथातील काटे
ही गुहा भयावह आता स्वप्नासम सुंदर वाटे
रसभाव भराला आले, काव्याहुन लोभसवाणे
बोलाविन घुमती वाद्ये, तालात नाचते प्रीती
शब्दाविन होती गीते, बेभान भावना गाती
हा लाभ अचानक झाला, हे कुण्या प्रभुचे देणे
आकृती मनोहर इथल्या मी एक त्यातली झाले
लावण्य बरसते येथे, सर्वांग तयात मी न्हाले
सौंदर्य जीवना आले, जन्माचे झाले सोने
हिंडता डोंगरापाठी सापडले कोरीव लेणे
विसरल्या उन्हातील वाटा, विसरले पथातील काटे
ही गुहा भयावह आता स्वप्नासम सुंदर वाटे
रसभाव भराला आले, काव्याहुन लोभसवाणे
बोलाविन घुमती वाद्ये, तालात नाचते प्रीती
शब्दाविन होती गीते, बेभान भावना गाती
हा लाभ अचानक झाला, हे कुण्या प्रभुचे देणे
आकृती मनोहर इथल्या मी एक त्यातली झाले
लावण्य बरसते येथे, सर्वांग तयात मी न्हाले
सौंदर्य जीवना आले, जन्माचे झाले सोने
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | दत्ता डावजेकर |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | पाहूं रे किती वाट |
राग | - | अभोगी कानडा |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
लेणे | - | वस्त्र / अलंकार / भिंतीवरील अथवा दगडावरील कोरीव काम. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.