A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मज श्रेय गवसले हो

हिंदुभूमीच्या गौरवात मज श्रेय गवसले हो
समर्पणाचे शुभ्रकमल हृदयात विकसले हो

अहंपणाचे तुटता अडसर
आत्मशक्तिचे विमुक्त निर्झर
दो तीरांना फुलवित फळवित हसत निघाले हो

स्फटिकगृहीच्या दीपापरि मन
प्रसन्‍नतेने ये ओसंडून
चिरंतनाच्या चिंतनात मग सहजचि रमले हो

ध्रुवापरि दृढ ध्येयप्रवणता
ऋजु समर्थता कार्यशरणता
बहुत शोधुनि हे जीवनस्वर आज उमगले हो
गीत - स्वर्णलता भिशीकर
संगीत - अप्पासाहेब (विनायक विश्वनाथ) पेंडसे
स्वर- समीर दुबळे
गीत प्रकार - स्फूर्ती गीत
  
टीप -
• 'प्रबोधन गीते, भाग १- ज्ञान प्रबोधिनीतील कार्यकर्त्यांनी रचलेली स्फूर्तीगीते' या गीत संग्रहातून.
ऋजु - सरळ, साधा.
प्रवण - आसक्त.
विमुक्त - मोकळा सुटलेला.
श्रेय - पुण्य / कल्याण.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.