A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मज जन्मभरी साथ तुझी

मज जन्मभरी साथ तुझी सतत लाभू दे, सजणा !

नाव तुझी सोबत मी
गाठ पडली रेशमी
बघ येत महापूर मजसी पैलतीरी ने, सजणा !

वादळ उठले, डुलत कलत-
होडीचे त्यात फिरत भोवरे
सावरी, पैलतीरी ने सजणा !

वीज कडाडे सळसळ शिरी पाऊस ये
पुढती पहा खडक रे
आवरी, पैलतीरी ने सजणा !