मैत्रिणींनो थांबा थोडं
मैत्रिणींनो, थांबा थोडं खुशाल मागनं हसा !
चला विचारू या वेडीला संसार करशील कसा?
गोरीपान ही काया कवळी, ओल्या हळदीनं होईल पिवळी
लगीन होता सासरी जाता जीव होईल ग पीसा !
पी पी सनई, तडाम् चौघडा, पंचकल्याणी येईल घोडा
त्यावर दोघं बसा !
नको करु लई नट्टापट्टा, दीर-नणंदा करतील थट्टा
सासूवरती तोंड टाकुनी बोलु नको वसवसा
शालू-चोळी दागदागिने, भरताराला नको मागणं
मोकळा होईल खिसा !
नाद नसावा शेजारणीचा, मंतर देईल कानफुकीचा
मनोमनी ग पती पुजावा देवावाणी जसा !
दानधर्माला म्होरं होऊन, कुणी भिकारी दारी पाहून
द्यावा ओंजळ पसा !
नव्या नवरीनं थोडं हसावं, सुगरणीवाणी काम दिसावं
घरंदाज या कुलशीलाचा वटीत घे ग वसा !

गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | कृष्णा कल्ले, पुष्पा पागधरे |
चित्रपट | - | आई उदे ग अंबाबाई |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
पंचकल्याणी | - | ज्याच्या अंगावर पाच शुभ चिन्हे आहेत असा. |
पसा | - | ओंजळ. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.